Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चेतन अढळकर यांना नाशिक येथे राज्यस्तरीय आदर्श गौरव समाजरत्न पुरस्कार

यावल प्रतिनिधी । येथील युवा सामाजीक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर विभाग जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी नाशिकच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

नाशिक येथील औरंगाबाद या सभागृहात दि. १६ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, नाशिकच्या आयोजीत भव्य पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल.एस. दाते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन कवी रमेश आव्हाड, शशीकांत सेलुकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. चेतन अढळकर यांनी कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीत संकट काळात नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन उल्लेखनिय जनजागृती करीत लक्ष वेधणारे कार्य केली. याशिवाय समरसता गुणवत्तापुर्ण निष्पक्ष आणी राष्ट्रीय एकात्मतेला चालना मिळेल अशा केलेल्या समाजकार्याची दखल संस्थेने घेत त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारसाठी निवड केली होती. चेतन अढळकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ॲड. जमील देशपांडे, ॲड. जयप्रकाश बाविस्कर, ॲड. किशोर शिंदे , एम टी रूले यांच्या सह विविध मान्यवर आणी मित्रमंडळीने त्यांचे अभीनंदन केले आहे.

 

Exit mobile version