Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एलआयसी आयपीओसाठी रविवारी स्टेट बँक सुरु राहणार

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा उद्या रविवारी ८ मे रोजी सुटी रद्द केली आहे. स्टेट बँकेसह पीएनबी च्या सर्व शाखा एलआयसी आयपीओसाठी त्यांच्या कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.

बहुतांश वेळा कार्यालयीन वेळे पूर्वी किंवा कामकाज वेळ संपल्यानंतर तसेच अन्य कारणामुळे वेलीवेली सुट्या घेत ग्राहकांना परत पाठवण्यात सर्वच बँका अग्रेसर आहेत. परंतु एलआयसी आयपीओ ४ मे पासून उघडण्यात आला असून ९ मे पर्यत राहणार आहे. त्यामुळे शनिवर आणि रविवारी गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार बोली लावू शकतील. रविवारी ८ मे रोजी साप्ताहिक सुटी असली तरी एलआयसी आयपीओ गुंतवणूकदारांसाठी स्टेट बँकेच्या शाखा सुरु राहणार आहेत.

आयपीओसाठी डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाहीत. यात पहिल्या वर्षी विशेष सवलत असून यापूर्वी देखील स्टेट बँकेने एसबीआय सिक्युरिटी डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याद्वारे एलआयसी आयपीओ गुंतवणुकीसाठी निर्देश दिले होते. असे असले तरी ग्राहकांना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही स्टेट बँक प्रशासनाने म्हटले आहे.

Exit mobile version