Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव शहरातील मुख्य नाल्यांच्या सफाईला प्रारंभ (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील पाच मुख्य नाल्यांच्या सफाईस आज गुरुवार २०  मे पासून प्रारंभ झाला आहे. यात मेहरूण ते ममुराबाद या मुख्य नाल्याची सफाईच्या कामास सुरुवात झाली असून याकामाची  महापौर जयश्री सुनील महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली. 

महापालिका प्रशासनातर्फे दरवर्षी पावसाळापूर्वी नालेसफाई मोहीम राबविली जाते. यंदा दि. २१  एप्रिलपासून उप नालेसफाई मोहिमेला सुरुवात झाली आहे. यात शहरातील ६८ उपनाले स्वच्छतेचे काम आरोग्य विभागाने सुरु केले असून आज गुरुवार २० मे रोजी पाच मुख्य नाल्यांच्या सफाईच्या कामांना  महापौर जयश्री सुनील महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.  शहरात २३ किमी. लांबीचे पाच मोठे नाले आहेत. या पाच प्रमुख नाल्यांसह ६८ उपनाल्यांच्या सफाईची मोहीम महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी केली जात आहे. या नाल्यामधील सर्व गाळ व कचरा काढून नाल्याचा प्रवाह मोकळा करण्यात येत आहे.  जून महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने नालेसफाईचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. . मेहरूण परिसर आणि श्रद्धा कॉलनीतील नाले सफाईच्या कामाची महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, प्रभाग समिती अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

पाच मुख्य नाल्यांमध्ये मेहरूण ते ममुराबाद, मानराज मोटर्स ते खेडी, रामदास कॉलनी ते चंद्रप्रभा कॉलनी, समता नगर ते दीपक फुड्स, इकबाल कॉलनी या पाच नाल्यांचा समावेश आहे.

शहरातील सर्व मुख्य नाले आणि उपनाल्यांची सफाई योग्य पध्दतीने आणि लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच नाल्याकाठी असलेले अतिक्रमण हटविण्यासंदर्भात संबंधित विभागाला कळवावे, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या.   दरम्यान, उपमहापौर कुलभषण पाटील यांनी सांगितले की, पावसाळाच्या पार्श्वभूमीवर शहातील मुख्य नाल्यांच्या सफाईचे कामास प्रारंभ झाला आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचे व्यवस्थितपणे निचरा होऊन नाल्या काठ लगत राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. शहरातील चारही प्रभागातील सर्व नाले साफ केले जातील.

 

 

भाग १

भाग २

Exit mobile version