Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काहीही कारण नसतांना भाजीपाला विक्रेत्यावर चाकूने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काहीही कारण नसतांना भाजीविक्री करणाऱ्या तरूणाला तीन जणांनी बेदम मारहाण करून मांडीवर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवार १४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत साहेबराव महाजन (वय-३८) रा. मारूती मंदीराजवळ, हरीविठ्ठल नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता रामानंद नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ चंद्रकांत महाजन हा काही कामानिमित्त आलेला होता. त्यावेळी तिथे निरंजन, केशव आणि निरंजनचा भाऊ (तिघांचे पुर्ण नाव माहित नाही) हे तिघे आले. त्यांनी काहीही कारण नसतांना चंद्रकांत महाजन याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत चंद्रकांतला भाजी कापण्याच्या चाकूनने मांडीवर वार करून जखमी केले. याप्रकरणी चंद्रकांत महाजन याने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी १४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील करीत आहे.

 

Exit mobile version