Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के : कोकण विभाग अग्रस्थानी

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून यात एकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात कोकण विभागाचा सर्वाधीक निकाल लागला आहे.

कोरोनानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच ऑफलाईन परिक्षा झाल्याने दहावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या अनुषंगाने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमीक मंडळाने आज दहावीचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (९५.९० टक्के) आहे.

यंदाच्या परिक्षेला १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थी बसले होते. यातील १५ लाख २१ हजार ००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी – टक्के ९६.९४ इतकी असल्याचे महामंडळाने जाहीर केले आहे. यात मुलींनी बाजी मारली असली असून त्यांच्या निकालाचा टक्का ९७.९६आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.

Exit mobile version