Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट : केरळातून दोन संशयित ताब्यात

NIA1

 

केरळ (वृत्तसंस्था) ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटप्रकरणी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनआयए) केरळमधून दोन तरूणांना ताब्यत घेतले आहे. अबू बाकर सिद्दकी आणि अहमद अराफथ अशी त्या तरूणांची नावं आहेत. दोघांकडून मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.

 

एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार केरळातील कासरगोड जिल्ह्यातून राष्ट्रीय सुरक्षा पथकाने रविवारी दोघांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांचा संबंध श्रीलंका बॉम्बस्फोटातील सुत्रधार जहरान हाशीम याच्याशी असल्याचे कळते. या दोघांची सध्या एआयएच्या मुख्यालयात चौकशी सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनआयए) रविवारी केरळमध्ये तीन ठिकाणी छापेमारी केली. २०१६ मधील आयसीसी कसारगोड मॉड्युल प्रकरणासाठी एनआयएने छापेमारी केली होती. ताब्यात घेण्यात आलेले दोघे आयसीसच्या संपर्कात असल्याचा संशय तपास यंत्रणाला आधीपासूनच आहे. तर कासरगोडमधून अनेक तरूण अफगाणिस्थानमध्ये दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याची चर्चा यापूर्वी झाली होती.

Exit mobile version