Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

”राखी कर्तव्याची” या उपक्रमाला जवानांकडून उस्फूर्त प्रतिसाद

एरंडोल प्रतिनिधी । मैत्री सेवा फाउंडेशन आयोजित ‘राखी कर्तव्याची’ या उपक्रमाअंतर्गत राखी आमच्यापर्यंत पोहचली आहे आणि तुम्ही आम्हाला दिलेले पत्रही आम्ही वाचले आणि आम्ही त्या राखी बांधल्या. तुम्ही पाठवलेल्या राखीसाठी बहिणींचे खूप खूप आभार, असा प्रतिसाद थेट बॉर्डर जवांनाकडून आला आहे.

२५ते ३० महिला बहिणींना थेट बॉर्डर वरून रक्षाबंधनाचा फोन आला.व जवानांनी देखील सांगितले मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे आयोजित राखी कर्तव्याची या उपक्रमाअंतर्गत आमच्यापर्यंत राख्या पोहोचल्या असून आम्ही आपण दिलेले पत्र देखील वाचले व आम्ही त्या राख्या बांधून घेतल्या व तुम्ही पाठवलेल्या राख्या बद्दल बहिणींनो आपले खूप खूप आभार आम्ही बॉर्डर वर असल्यामुळे क्षमा असावी आम्ही आपल्याला कोणतेही गिफ्ट नाही देऊ शकत पण भारताच्या रक्षणा सोबतच आपले देखील रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे हेच,आपल्या राखी आणि प्रेमपूर्वक पत्रामुळे आम्हाला आमचे कर्तव्य बजावण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली असे फोन जवानांकडून बऱ्याच महिलांना कृतज्ञतापूर्वक करण्यात आले.

यावेळी जवानांनी राखी बांधतांनाचे आपले फोटो देखील पाठवले आहेत.या उपक्रमातील राख्या मैत्री सेवा फाउंडेशनने जवानांसाठी  राखी मेजर विजय पाटील यांच्या हस्ते शिमला (हिमाचल प्रदेश) व जम्मू , काश्मीर येथे पोहचवण्यात आल्या. नौ सेनेच्या जवानांसाठी कोची (केरळ) येथील युनिटसाठी नेव्ही ऑफीसर अमितसिंग राजपूत यांच्या तर्फे पाठवण्यात  आले.आपल्या एरंडोल शहरातील सर्व महिला मंडळ व माता-भगिनीं मुळे हा उपक्रम यशस्वी झाला.त्यामुळे सर्व महिला भगिनिंचे आभार व जवानांनी देखील उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे देखील आभार मैत्री सेवा फाउंडेशनच्या वतीने मानण्यात आले.

Exit mobile version