Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरणगावात दिव्यांग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम !

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने वरणगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात हिरकणी फाऊंडेशनच्या वतीने रविवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता  विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात तहसीलदार निता लबडे यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.

जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ उपक्रम राबविण्यात येत आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात देखील हिरकणी फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात पुरवठा अधिकारी तथा तहसीलदार निता लबडे यांच्या उपस्थितीत रविवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सरदार वल्लभभाई पटेल लेवा सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या दिव्यांग बांधवांच्या  दिव्यांग बांधवांच्या येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यात येवून त्यांना मार्गदर्शन केले.

Exit mobile version