Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम; विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहीत मुदतीत सादर करण्याचे आवाहन महाबळ येथील जळगाव जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा संशोधन अधिकारी बी.यू.खरे यांनी आज शुक्रवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की,  “सीईटी, जेईई, नीट, गेट यासह पदविका अभ्यासक्रम पुर्ण करुन पदवी करीता व्यावसायीक अभ्यासक्रम प्रक्रियेअंतर्गत अंतर्गत आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

ज्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्रासाठी महाबळ येथील जळगाव जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात अर्ज दाखल केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी शासनाच्या संकेतस्थळाला भेट देऊन तात्काळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुन त्याची एक प्रत १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती या कार्यालयाकडे सादर करावी, असे आवाहन  सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बी.यू. खरे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version