Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद येथे फारुक शेख यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख अब्दुल्ला यांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामाबाबत नशिराबाद शहा बिरादरी व कब्रस्तान कमिटीच्या माध्यमाने फारुक शेख अब्दुल्ला जळगाव या एकमेव व्यक्तीचा स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी नशिराबाद उरूसच्या निमित्ताने खुलताबाद येथील पीर ए तरेकिन हफीज़ोद्दीन उर्फ बाबाजानी, नाशिक येथील सय्यद जिलानी ,पीर के तरेकिन नशिराबाद जमीर बाबा, जळगाव जिल्हा जमियत उलमा चे अध्यक्ष मुफ़्ती हारून नदवी, जिल्हा परिषद भाजपचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिवसेनेचे माजी सरपंच विकास पाटील, राष्ट्रवादी चे माजी सरपंच पंकज महाजन ,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सय्यद बरकत अली व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव एजाज मलिक यांच्या उपस्थितीत शाहबिरादरीचे सलीम शहा, मकसूद शहा, शकील शहा, फिरोजशहा व रागिब ब्यवली यांनी फारुक शेख यांचा गौरव केला त्या वेळी जळगाव शाह बिरदारीचे अँग्लो उर्दू हायस्कूल चे अल्तमश शाह, इदगाह ट्रस्टचे अनिस शाह, अल खैर ट्रस्टचे यूसुफ शाह  तसेच जिल्ह्यातील नामवंत उर्दू शायर यांची विशेष उपस्थिति होती.

यावेळी साबीर मुस्तफाआबादी यांनी फारुक शेख यांच्या सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचा आढावा सादर केला तेव्हा उपस्थित हजारो लोकांनी टाळ्या वाजवून त्यांच्या कार्याला सलाम केला.

सत्कारास उत्तर देतांना फारुक शेख यांनी नशिराबादच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक व शाह बिरादरीचे आभार मानले व हा माझा एकट्याचा गौरव नसून माझ्या सोबत काम करणारे सर्व सहकाऱ्यांच्या गौरव आहे. भविष्यात या मानपत्रा मुळे माझ्यावर जबाबदारी अजून वाढवण्यात आल्याचे त्यांनी मान्य करून समाजाच्या हितासाठी जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत सामाजिक कार्य करत राहू अशी ग्वाही दिली.

 

Exit mobile version