सोयाबीनला राज्य शासनाचा यंदा ३८८० रुपये हमी भाव

सातारा । यावर्षी शासन सोयाबीनसाठी महाराष्ट्रात  ३८८० हमी भाव देणार असून येत्या १५ ऑक्टोबरपासून राज्यात खरेदी केंद्र सुरु होतील, अशी माहिती महाराष्ट्राचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली.

बाळासाहेब पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील सोयाबीनचे पीक काढणे व मळणी काम अंतिम टप्यात आहे. काही शेतकरी आपला माल लवकरात लवकर विकावा यासाठी खासगी व्यापार्‍यांकडे जात आहेत तरी शेतकर्‍यांनी राज्य शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर आपला माल विकावा.

महाराष्ट्रात अजूनही पाऊस पडत आहे. त्यामुळे सोयाबीनला ओलसरपणा येण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांनी काढलेल्या सोयाबीन विक्रीची घाई करु नये. सोयाबीनला राज्य शासनाने ३ हजार ८८० रुपये भाव दिला आहे. राज्य शासनाकडून १५ ऑक्टोबर पासून सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करूनच शेतकर्‍यांनी सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही सहकारमंत्री पाटील यांनी केले आहे.

Protected Content