जूनच्या तिसऱ्या सप्ताहात पेरणीयोग्य पाऊस- पंजाबराव डख

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – राज्यात तसेच उत्तर महाराष्ट्र विभागात जूनच्या तिसऱ्या सप्ताहात पेरणीयोग्य पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे.

सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी जामनेर तालुक्यातील नेरी येथे क्रांती ऍग्रो, ला भेट दिली. यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, यावर्षी २२ मे च्या सुमारास अंदमान निकोबार परिसरात मान्सून सक्रीय होईल. तर राज्यात तसेच अन्य भागात  २ जूनच्या दरम्यान पहिल्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर जूनच्या तिसऱ्या सप्ताहात १८ जून दरम्यान पेरणी योग्य पाऊस राहील. तसेच २९ मे ते १० जून दरम्यान ठिबक सिंचनावरील कपाशी लागवड करण्यासाठी कालावधी योग्य राहणार असून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात बऱ्यापैकी पाऊसमान राहील, अशी शक्यता वर्तवली आहे.

यावेळी पायोनिअर कंपनीचे विपणन अधिकारी प्रमोद जाधव, नेरी येथील प्रगतशील शेतकरी पप्पू पाटील, सुरेश खोडपे, अनिल खोडपे, पिंटू गायकवाड, सुभाष खोडपे, किशोर खोडपे, लीलाधर राणे, विवेक कुमावत, राजेश वाघ, राजेश कुमावत, शुभम खोडपे, डॉ.ऋषीकेश खोडपे, अक्षय खोडपे आदी शेतकरी बंधू उपस्थित होते.

Protected Content