Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोपान तायडे यांची सेवापूर्ती

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील यावल पंचायत समितीचे वरिष्ठ कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोपान तायडे यांच्या सेवानिवृत्तीपर निरोपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावल येथे पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत मावळते उपसभापती योगेश दिलीप भंगाळे व सदस्य व गटनेते शेखर पाटील, दिपक पाटील, यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, पंचायत समितीचे मावळते सदस्य सरफराज तडवी, ग्रामविस्तार अधिकारी किशोर सपकाळे, तालुका आरोग्य अधिकारी हेमन्त बऱ्हाटे, गटशिक्षण अधिकारी नईम शेख, कक्ष अधिकारी सरवर तडवी, सेवानिवृत्त कक्ष अधिकारी नाना बोदडे यांच्यासह कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच मान्यवर मंडळी सोपान तायडे यांच्या निरोप संमारंभास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.पी.कोते यांनी केले. यावेळी उपस्थित शेखर पाटील, अतुल पाटील, नाना बोदडे, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्यासह आदी मान्यवरांनी सेवानिवृत्त झालेले सोपान तायडे यांच्या ३९ वर्षाच्या प्रशासकीय सेवे संदर्भात मनोगत व्यक्त करतांना एक शिस्तप्रिय, आपल्या कर्तव्याची जाणीव असणारे मृदू भाषिक व सर्वांशी आपुलकीने वागणारे असे अधिकारी म्हणून त्यांचा गुणगौरव केला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तायडे यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला

Exit mobile version