लवकरच कोरोना देखील संपेल – विषाणूशास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद

वॉशिंग्टन वृत्तसंस्था । कोरोनाविरोधात लसीकरण हे सर्वात मजबूत शस्त्र असल्याचं वॉशिंग्टन येथील शास्त्रज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद यांनी सांगितले. तर, कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो आणि लवकरच कोरोना देखील संपेल, असेही त्यांनी सांगितले आहे..

मात्र, सध्याच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाचा वेग खूप वेगवान असल्याने गंभीर आजार असणाऱ्‍या लोकांनी लस घेतली नसल्यास त्यांच्या जीवाला धोका संभवतो, त्यामुळे सर्वांनी लसीकरण करुन घेणे खूप महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. व्हायरस आणि माणूस यांच्यात हे एक साधर्म्य आहे. विषाणू जसे आपले स्वरुप बदलतो, तसेच माणसाची रोगप्रतिकारक क्षमताही स्वत:ला विकसित करत असते. आपण बचावासाठी मास्क, हँड सॅनिटायझर्स, सोशल डिस्टन्सगिंचा वापर करत आहोत. आपल्याकडे लस, अँटिव्हायरल आणि अँटिबॉडिज ही शस्त्रे आहेत, जी आपण कोरोनाविरुद्ध वापरली आहेत, असेही डॉ. कुतुब यांनी सांगितले. दरम्यान, देशात गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी (दि.१६) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,७१,२०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

 

Protected Content