Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवर्‍याचा पगाराचा नेमका आकडा माहिती अधिकारात बायकोला समजणार

नवी दिल्ली । आपल्या नवर्‍याला नेमका किती पगार मिळतोय याची माहिती जाणून घेण्याचा बायकोला अधिकार असल्याचे कोर्टाने आधीच मान्य करण्यात आले असून या बाबीला लवकरच आरटीआयच्या कक्षेत आणले जाणार आहे.

सध्या माहितीच्या अधिकाराची व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात आता नवर्‍याच्या वेतनाची माहिती पत्नीला मिळावी अशी तरतूद करण्यात येणार आहे. आपल्या नव़र्‍याचा नेमका पगार किती हे जाणून घेण्यासाठी बायकोची नेहमीच धडपड सुरू असते. यासाठी आता अनेकांनी थेट सरकारदरबारी गार्‍हाणे देखील मांडल्याचे पुढे आले आहे. तर अनेक खटल्यांच्या माध्यमातून ही प्रकरणे न्यायालयातही गेली आहेत.

दरम्यान, नवर्‍याच्या पगाराची अचूक माहिती मिळावी यासाठी केंद्रीय माहिती आयोगाकडे अनेक महिलांनी पत्रदेखील पाठविले आहेत. कोणाचीही वैयक्तिक माहिती न देण्याचा नियम असला तरी मानवतेचा मुद्दा विचारात घेऊन नवऱयाच्या पगारासंदर्भातील माहिती देण्याबाबत केंद्रीय माहिती आयोगाने विचारविनमय सुरू केला आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्या नवरोबाचा नेमका पगार किती आहे, यासंदर्भात चोख माहिती बायकोला मिळणार आहे.

खरं तर आपल्या नव़र्‍याचे इतर महिलेसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. त्यामुळे तो पगाराचा अधिक हिस्सा तिच्यावर खर्च करीत असून परिणामी आपल्या नवऱयाचा नेमका पगार किती आहे, अशा आशयाची अनेक पत्रे सध्या माहिती आयोगाकडे प्राप्त झाली आहेत. यानुसार हा निर्णय घेतला जाणार आहे.

Exit mobile version