गांधी जयंतीपासून ‘भारत जोडो यात्रा’ सुरु करणार – सोनिया गांधी

उदयपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसंस्था | काँग्रेसतर्फे उदयपूर येथे चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्ष गांधी जयंतीपासून देशभरात ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करणार असल्याचं सोनिया गांधी यांनी सांगितलं.

काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेत्यांना संबोधित करत सहभागी नेत्यांचे आभार मानले. यासह काँग्रेस पक्ष देशभरात भारत जोडो यात्रा सुरू करणार असल्याचे सांगत सर्व कार्यकर्त्यांनी या यात्रेत सहभागी व्हावं. असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं.

यात बोलतांना, “२ ऑक्टोबर अर्थातच गांधी जयंतीपासून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू होणार असल्याचं सांगत या यात्रेमुळे जातीय सलोखा राखण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात्रेत तरुण आणि वृद्ध सगळेच सहभागी होणार असून जिल्हास्तरावरही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. सोबतच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस अध्यक्षांनी दिली.

Protected Content