Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोनिया गांधी यांची राजीनाम्याची तयारी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपले पद सोडण्याची तयारी केली असून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

आज काँग्रेस कार्यकारिणी समितीची महत्वाची बैठक दिल्लीत होत आहे. यात प्रामुख्याने पक्षाच्या अध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या पक्षाची धुरा हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आहे. मात्र पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष हवा अशी मागणी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, सोनिया गांधी यांनी आजच्या बैठकीत राजीनाम्याची तयारी दर्शविली असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version