Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोनभद्र हत्याकांड : पिडीत परिवारांना पोलीस पोलीस बंदोबस्तात भेटल्या प्रियंका गांधी

67071797 2384083768547217 7636262470000050176 n 640x360

 

सोनभद्र (वृत्तसंस्था) सोनभद्र जिल्ह्यातील हत्याकांडातील पीडितांना भेटण्यापासून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना कालपासून रोखले जात होते. परंतू प्रियंका या पीडित कुटुंबांची भेट घेण्यावर ठाम होत्या. अखेर आज  उत्तर प्रदेश सरकार नरमले व पिडीत परिवारांना पोलीस पोलीस बंदोबस्तात प्रियंका गांधींना भेटू दिले.

 

या संदर्भात अधिक असे की, सोनभद्र जिल्ह्यातील हत्याकांडातील पीडितांच्या भेटीला जात असतांना काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्रियंका यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडत पीडितांना भेटल्याशिवाय परत जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्या चुनार रेस्ट हाऊसवर रात्रभर पासून थांबून होत्या. दरम्यान, प्रशासनाने रेस्ट हाऊसचे पाणी, विद्युत पुरवठा खंडित केला असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता.

 

दरम्यान, पीडितांच्या भेटीनंतर प्रियंका गांधी यांनी ट्वीट केले आहे की, शेवटी सरकारला आमच्या मागणी पुढे झुकावेच लागले. पिडीत परिवारांना आम्हाला भेटण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. परंतू पिडीतां शेवटी आम्हाला भेटू द्यावेच लागले. सोनभद्र येथील हत्याकांडात मारलेल्या गेलेल्या आदिवासी बांधवांचे परिवार पूर्णपणे तुटलेले आहेत. त्यांच्याजवळ आता फक्त अश्रूंशिवाय काहीही उरलेले नाही. या आदिवासी बांधवाना मदत करण्या ऐवजी पोलीस प्रशासन योगी सरकारच्या आदेशावर उलट त्यांना अधिकचा त्रास देत आहे. हे आदिवासी बांधव एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत, असे देखील प्रियंका यांनी म्हटले आहे.

Exit mobile version