Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तीन बहिणींच्या एकुलत्या एक भावाने केलं असं काही… परिसरात हळहळ !

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । आईवडीलांच्या निधनानंतर खोटे नगरात राहणाऱ्या तीन विवाहित बहिणींच्या एकुलत्या एक भावाने राहत्या घरात जीवनयात्रा संपविल्याची घटना रविवारी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. घरमालकाच्या लक्षात आल्याने हा प्रकार समोर आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव एमआयडीसीत एका कंपनीत कामाला असलेल्या बाळासाहेब लोटन पवार (३५, रा. खोटेनगर) याच्या आई-वडिलांचे चार वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर तीन बहिणींचे लग्न झाले आहे. त्यामुळे हा तरुण जळगावातील खोटेनगरात भाडेतत्वाच्या घरात एकटाच राहत होता. रविवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपार झाली तरी तो घराबाहेर आला नाही, त्यामुळे घरमालक त्याला पहायला गेले असता त्यांना हा तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. त्याला तातडीने पोलीसांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविदयालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.  मयत बाळासाहेब पवार याला तीन बहिणी असून त्या सुरत, पुणे व धुळे जिल्ह्यातील नंदाडे येथे राहतात. अगोदरच आई-वडिलांचे निधन झालेले व त्यात एकुलत्या एक भावानेही जीवन संपविल्याने बहिणींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version