Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आर्थीक विवंचनेतून प्रौढाने राहत्या घरात केलं असं काही !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील ५२ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरातील खिडकीला स्कार्फ लावून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार १७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी दुपारी ५ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष त्र्यंबक लोणी वय-५२ रा.फुलगाव ता.भुसावळ असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, संतोष त्रंबक लोणी हे आपल्या परिवारासह भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात त्यांचे वडील गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती आणि अनियमित वेतनामुळे त्रस्त होते.

याला कंटाळून संतोष लोणी यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवार १७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी खाली उतरवत त्यांना वरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी यांनी घोषित केले. दरम्यान याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर पाटील हे करीत आहे.

Exit mobile version