Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोमय्या पुन्हा मैदानात ; उध्दव ठाकरेंवर केला भ्रष्टाचाराचा आरोप

मुंबई -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काही दिवसांपुर्वी किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू आहे. त्यानंतर आता ते पुन्हा मैदानात उतरले आहे.  किरीट सोमय्या भ्रष्टाचाराची प्रकरण, आर्थिक घोटाळे खणून काढण्यासाठी ओळखले जातात. आत किरीट सोमय्या यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर ७०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.

 

कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे व महाराष्ट्र सरकारने रिचार्डसन क्रूडास या भारत सरकारच्या कंपनीकडून मुलुंड येथील जागा ताब्यात घेतली. सिडकोला तात्पुरते हॉस्पिटल बांधून देण्याचे आदेश दिले. सिडकोने ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला १ हजार ८५० खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे आदेश दिले. ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती.

 

रिचार्ड्सन कृडास कंपनी कडून भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीचा एकही पैसा देण्यात आला नाही असा सुद्धा आरोप आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस, आयकर विभाग, ईडी कार्यालय यांना तक्रार दिली असल्याचे सांगितले. या कोविड सेंटर प्रमाणे मुंबई मधील 15 कोविड सेंटरसाठी 700 कोटी रुपये भाडे घोटाळे करण्यात आले आहेत, असा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे.

Exit mobile version