Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बनावट कागदपत्रांद्वारे सोलर कंपनीला जमीन विकली; गुन्हा दाखल

FIR

 

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोढरे शिवारातील तब्बल ९१ लाख रूपयांची जमीन ही बनावट कागदपत्रे तयार करून सोलर कंपनीला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी तत्कालीन उपनिबंधकांसह दहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, गीता गोविंद कुलकर्णी यांची तालुक्यातील बोढरे शिवारात गट नं.६९/०१ मध्ये शेत जमीन आहे. परंतू दि.३/०८/२०१८ रोजी ही जमीन सोलर कंपनीला विकण्यात आली. यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून बनावट व्यक्तींना खरेदीसाठी उभे करण्यात आले. त्यांना हा प्रकार काही दिवसांनी समजला.

दरम्यान, सुरेंद्रकुमार आर्य, निशांत आर्य, सुशिल आर्य, भगवान दत्त शर्मा, कुशाग्र अग्रवाल, यशप्रिय आर्य, नाना पुंडलिक पाटील, मनिषा उपासनी, डेटा इंट्री ऑपरेटर(पूर्ण नाव माहिती नाही), व इतर तीन अनोखळी व्यक्ती यांनी आप आपसात संगनमताने वेगवेगळ्या बनावट व्यक्ती, वेगवेगळे बनावट कागदपत्रे तयार करुन आर्थिक लाभासाठी सोलर कंपनीला, ९१ लाख रुपयांना शेत जमीनीची फसवणुकीच्या उद्देशाने खरेदीखत तयार केल्याचे दिसून आले. धक्कदायक बाब म्हणजे यात तत्कालीन उपनिबंधक मनिषा उपासनी व चाळीसगाव येथील कार्यालयातील डेटा एंट्री ऑपरेटर यांचा देखील सहभाग असल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अ‍ॅड. केदार चावरे (रा.शाहु नगर, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरुन तात्कालीन रजिस्टर मनिषा उपासनीसह सुरेंद्रकुमार आर्य, निशांत आर्य, सुशिल आर्य, भगवान दत्त शर्मा, कुशाग्र अग्रवाल, यशप्रिय आर्य, नाना पुंडलिक पाटील, डेटा एंट्री ऑपरेटर(पूर्ण नाव माहिती नाही) व इतर तीन बनावट अनोखळी व्यक्ती यांच्यावर भादवी कलम ४२०सह विविध कलन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यात सोलर कंपनीला बनावट कागदपत्रे तयार करून जमीनी विकल्याची अनेकदा चर्चा होत असते. या प्रकरणामुळे ही बाब प्रत्यक्षात असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Exit mobile version