Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोलापूरात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घोड्यावरुन रॅली; गुन्हा दाखल होणार

solapur news

सोलापूर वृत्तसंस्था । सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून लेबर पार्टीच्या बशीर अहमद यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु उमेदवारी दाखल करण्यापूर्वी त्यांनी घोड्यावर बसून रॅली काढली. रॅलीदरम्यान ताशांचा गजर, नाचणारी कार्यकर्ते मंडळी आणि घोड्यावर बसलेले हे बशीर अहमद. हे दृश्य पाहून ही एखाद्या लग्नाची वारात असल्याचा लोकांचा समज झाला होता. परंतु ही निवडणुकीची रॅली होती.

विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्यामुळे सोलापूर मध्य हा मतदारसंघ आधीच चर्चेत आहे. त्यात आता या अनोख्या उमेदवारीमुळे मतदारसंघ अधिक चर्चेत आला आहे. बशीर अहमद यांचा हा राजेशाही थाट फक्त घोड्यावरील मिरवणुकीपुरता मर्यादित नाही. ते म्हणतात की, आमदार झाल्यावर थेट गृहमंत्री होऊन आतंकवाद्यांचा नायनाट करण्याचा मनसुबा आहे. तसेच फरार दहशतवादी दाऊद इब्राहिमला आठ दिवसांत अटक करुन भारतात आणण्याचा दावाही त्यांनी केला आहे.

बशीर अहमद यांनी मोठ्या थाटात मिरवणूक काढली खरी, मात्र ही मिरवणूक कायद्याच्या चौकटीत गुन्हा ठरण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने प्रचारात प्राण्यांचे प्रदर्शन आणि वापर करण्यास मनाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे बशीर यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

Exit mobile version