Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमच्याशी समाजवादी संलग्न, पण एमआयएम राष्ट्रवादीकडे – नाना पटोले

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या जागेसाठी भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वच पक्ष एकजुटीने अपक्ष आमदारांना त्यांच्याकडे वळवत आहे. अशा वेळी एमआयएमच्या मतांसाठी कोण प्रस्ताव देणार यासंदर्भात आमच्याशी समाजवादी संलग्न आहे, त्यामुळे आमच्याकडून समाजवादी पक्षाला विनंती केली जाणार आहे. एमआयएम राष्ट्रवादीकडे असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

राज्यसभेच्या निवडणुक पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह भाजपाकडून आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय आमदाराची पळवापळवी टाळण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना मुंबईत बोलावले आहे.नेमके यावेळी भाजपाला राज्यसभेत मागे सारण्यासाठी महाविकास आघाडीने मदत मागावी असे आवाहन ओवेसी यांनी केले. यावरून सर्वांनाच प्रश्न असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एमआयएम पक्षाची ज्यांच्यासोबत युती असेल, तेच लोक एमआयएमकडे त्यांना निमंत्रण देतील, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
शिवसेनेच्या आमदार हॉटेलमध्ये आहते. काँग्रेसचे आमदार आज मुंबईमध्ये येणार आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज नसून मतदानाची प्रक्रिया सांगितली जाणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे राज्यसभेच्या निवडणुकीत पाठिंब्यासाठी आमच्याकडे महाविकास आघाडीचा प्रस्ताव, कोणीही माझ्यासोबत किंवा आमच्या आमदारासोबत संपर्क साधलेला नाही. आम्ही वाट पाहू. जर महाविकास आघाडीला गरज असेल तर त्यांनी संपर्क साधावा. गरज नसेल तर आम्ही आमचा निर्णय घेऊ असे एमआयएमचे खा. ओवैसी यांनी म्हटले आहे.

Exit mobile version