Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सामाजिक संस्थांनी महिलांना रोजगाराची संधी मिळवून द्यावी : आ.जावळे

04e70490 8782 4d97 af22 f350ee3cc6ff

यावल (प्रतिनिधी) आपल्या देशातील पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेले शासन हे महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातुन स्वावलंबी करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातुन सक्रीय आहे. तसेच मिळेल तो व्यवसाय करून रोजगार मिळवण्यात आपल्या देशातील महिलाही अग्रेसर आहेत. विविध सामाजिक संस्थांनी महिला शक्तीला बळकट करण्यासाठी विविध व्यवसाय व रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणे गरजे असल्याचे मनोगत आमदार हरीभाऊ जावळे यांनी आज(दि.६) येथे कार्यक्रमात व्यक्त केले.

 

येथील खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलनातील सावित्रीमाई फुले बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियान अंतर्गत मोफत रोजगारक्षम कौशल्यच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ब्युटीपार्लर प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमात आ. जावळे बोलत होते. यावेळी तालुक्यातील सुमारे १५० महिलांना प्रशिक्षण पुर्व प्रमाणपत्र वितरण करण्यात आलीत, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक नारायण शशीकांत चौधरी, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल वसंत पाटील, उपनगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते, पोलीस निरिक्षक डी.के. परदेशी, भाजपाचे शहराध्यक्ष हेमराज (बाळु) फेगडे, भरत चौधरी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक कपील जोशी, आदिवासी प्रकल्पस्तरीय समितीच्या अध्यक्ष मिना राजु तडवी यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त पक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. कांचन पाटील यांनी केले तर आभार सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भास्कर पारधे यांनी मानले. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पारधे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष मधुकर पारधे, सचिव उषा पारधे यांच्यासह सगळ्या संचालकांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version