सोशल मीडियाच्या माध्यमातून इंजिनिअर तरूणीची छेड

पिंपरी-चिंचवडजवळील निगडी पोलीसात अज्ञाताविरोधात गुन्हा

पिंपरी चिंचवड । व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामचा अशा सोशल मीडियाचा आधार घेवून एका अज्ञात आरोपीने आयटी अभियंता तरूणीची छेड काढल्याचा प्रकार उघकीस आला असून याबाबत अज्ञात आरोपी विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सोशल मीडियातून नग्नावस्थेतील एक मिनिटांचा व्हिडीओ पाठव, अन्यथा तुझा प्रायव्हेट फोटो मुंबईच्या फेमस ग्रुपवर दिसेल. तुझ्या मित्रांना पर्सनलीही ते फोटो शेअर करेन, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीने दिली. 24 वर्षीय तरुणी गुरुवारी कामात असताना, दुपारी 12 च्या सुमारास तिला व्हॉट्सअॅपवर मेसेज आला. “तुझा प्रायव्हेट फोटो माझ्याकडे आहे. मला ब्लॉक करु नकोस, मला ब्लॉक केलंस तर तो फोटो मुंबईच्या फेमस ग्रुपवर दिसेल.” हे वाचून तरुणी हादरली. त्यानंतर त्याने तरुणीचा चेहरा आणि त्याखाली इतर महिलेचा नको ते फोटो पाठविला. असा मेसेज पाठवला. “माझ्याकडे तुझ्या मित्रांची लिस्ट आहे. त्यांनाही हा फोटो पर्सनली शेअर करेन, असं नको असेल तर तुझा नग्नावस्थेतील एक मिनिटांचा व्हिडीओ पाठव. तो व्हिडीओ मी कोणाला पाठवणार नाही,” असा त्याने मेसेज केला. पोलिसांना तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.

 

गेल्या दोन दिवसांपासून तो तरूणीच्या व्हॅट्सॲपवरून कॉलही केला होता. त्यानंतर त्याने इन्स्ट्राग्रामवरही छळ करण्यास सुरूवात ही केली. तरूणीने या गोष्टीला कोणताही प्रतिक्रिया न देता सरळ निगडी पोलीस स्टेशन गाठलं आणि अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या नंबरवरुन आरोपी हा प्रताप करत होता, तो एकतर परदेशातील असावा किंवा एखाद्या अॅपवरील नंबर असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Add Comment

Protected Content