Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इन्स्टाग्रामवरून तरूणीची सोशल मिडीयात बदनामी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तरूणीच्या इन्स्टाग्राम खात्यावरून इलेक्ट्रॉनिक साधनांचा आधारे तिच्या फोटोचा आधार घेत अश्लिल मजकूर टाकून सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात ३० वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान अज्ञात व्यक्तीने ईलेक्ट्रॉनीक साधनाचा वापर करून तिच्या इन्स्टाग्रामच्या खात्यावरून तिचा फोटो लावून अश्लिल मजकूर टाकून सोशल मिडीयात व्हायरल करत बदनामी केली. हा प्रकार शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता उघडकीला आला. तरूणीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ८ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे करीत आहे.

Exit mobile version