Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सामाजिक समरसता हे गावाचे वैभव – जनार्दन हरी महाराज

साकळी ता. यावल, प्रतिनिधी । स्वर्गरथाचा वापर कमीत कमी व्हावा, अशी अपेक्षा फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी केली. तसेच जि. प. सभापती रविंद्र पाटील यांच्या हस्ते स्वर्गरथाचे लोकार्पण करण्यात आले.

सामाजिक समरसता हे गावाचे वैभव असून गावातील सर्वधर्मजातींचे मन मजबूत होणे गरजेचे आहे. सर्वधर्मीय एकोपा ही गावाची गरज आहे.माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे व मानवतेच्या साखळीतून आपण आपण कोरोना सारख्या अनेक संकटांचा सामना करून लढाई जिंकू शकतो आई-वडिलांची आठवण म्हणून तसेच गावाची गरज ओळखून गावास स्वर्गरथ लोकार्पण करणेही ही बाब समाजाप्रती फार व्यापक दृष्टिकोन सांगून जाणारी आहे. परंतु स्वर्गरथाचा वापर कमीत कमी व्हावा, अशी अपेक्षा फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. तसेच गावास स्वर्गरथ लोकार्पण केल्याबद्दल रविंद्र पाटील यांचे कौतुकही केले.

साकळी ता. यावल येथे स्व. आण्‍णासो.सूर्यभान हिरामण पाटील व स्व.सोनाबाई सूर्यभान पाटील यांच्या स्मरणार्थ जळगाव जि.प.चे शिक्षण, क्रीडा व आरोग्य सभापती रविंद्र(छोटू)सूर्यभान पाटील यांच्या तर्फे साकळी गावास स्वर्गरथाचे लोकार्पण दि.२३ रोजी करण्यात आले. स्वर्गरथाचे लोकार्पण महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज(फैजपूर), ह.भ.प.जळकेकर महाराज,ह.भ.प.अंकुश महाराज विश्व हिंदू परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते धोंडू अण्णा माळी मधुकर शिंपी यांच्या हस्ते पूजा करुन करण्यात आले.यानंतर जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यानंतर रवींद्र पाटील यांच्या हस्ते उपस्थित संत- महंतांचा सत्कार करण्यात आला यावेळी जेडीसीसी बँकेचे संचालक गणेश दादा नेहेते, यावल कृऊबाचे माजी संचालक विलास पाटील, उपसरपंच वसीम खान, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव बडगुजर ,शरद बिऱ्हाडे, दिनकर माळी,खतीब तडवी यांचेसह माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील,सै.अहमद सै.मिरा, मुसेखाँ पठाण, नूतनराज बडगुजर,राजू सोनवणे, विलास काळे, विकासो
चे माजी चेअरमन निंबादास पाटील, पांडुरंग निळे,रामकृष्ण खेवलकर,सूर्यभान बडगुजर, किसन महाजन, भिका पाटील,शेख सलिमभाई, भाजयुमोचे यावल तालुका उपाध्यक्ष योगेश (आप्पा) खेवलकर, राजू जंजाळे, अशोक जंजाळे, विलास पवार, नितिन फन्नाटे,ज्ञानेश्वर मोते,बंटी बडगुजर, आत्माराम तेली,भागवत रावते(शिरसाड) यांचेसह विविध पदाधिकारी व ग्रामंस्थ उपस्थित होते.रविंद्र (छोटू)पाटील यांनी आई-वडीलांच्या स्मरणार्थ गावास स्वर्गसथ दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version