Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत चौधरी यांनी केला देहदानाचा संकल्प

जळगाव प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्ते, युवा पत्रकार आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी यांनी सोमवारी ८ फेब्रुवारी रोजी ३४ व्या वाढदिवसानिमित्त देहदानाचा संकल्प केला. याबाबतचा फॉर्म भरून तो अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सुपूर्द केला.

विश्वजीत चौधरी हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा समन्वयक आहेत. याशिवाय दैनिक लोकसत्ताचे  जिल्हा प्रतिनिधी आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या जनसंपर्क सहाय्यक असून विलीनी मीडिया सर्विसेसचे संचालक आहेत. गेली १५ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून माध्यम क्षेत्रात त्यांना १० वर्षांचा अनुभव आहे. 

देहदान हे महत्वाचे कार्य आहे. मात्र आजदेखील समाजात देहदानाविषयी गैरसमज आहेत. ‘मरावे परी देहरूपी उरावे’ या उक्तीनुसार विश्वजीत चौधरी यांनी संकल्प केला आहे. सर्वसामान्यांच्या मनात देहदान व अवयवदाना‌व‌षियी अनेक शंका आहेत. त्यामुळे जनजागृती म्हणून स्वतः पुढाकार घेऊन विश्वजीत चौधरी यांनी देहदानाचा फॉर्म अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सोमवारी भरून दिला. यावेळी उप अधिष्ठाता मारुती पोटे आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version