Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…म्हणून भारतातील जनता नाराज झाली ! : मिटकरींचा सोमय्यांना टोला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्या यांना राज्यसभेचे तिकिट न दिल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे.

 

भाजपने महाराष्ट्रातील राज्यसभा उमेदवारीची नावे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून किरीट सोमय्या  यांना टोला लगावण्यात आला आहे. भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार मुन्ना महाडीक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर यात किरीट सोमय्या यांचे नाव नसल्याने आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना टोला लगावला आहे.

 

आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून किरीट सोमय्या यांना राज्यसभा उमेदवारीवरून खोचक टोला लगावला आहे. तथ्यहिन घोटाळे बाहेर काढताना रात्रंदिवस घसा ओरडुन ओरडुन रोज पत्रकार परिषदा घेणार्‍या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, असे उपहासात्मक ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. यासोबत किरीट सोमय्या यांचा एक हसरा फोटोही शेअर केला आहे.

Exit mobile version