Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात आतापर्यंत 21 लाख 83 हजार जणांना कोरोना लसीकरण

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 21 लाख 83 हजार 370 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 16 लाख 48 हजार 252 जणांना पहिला डोस तर 5 लाख 35 हजार 118 जणांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज गुरूवारी 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पाठविलेल्या प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 16 लाख 48 हजार 252 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 5 लाख 35 हजार 118 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 21 लाख 83 हजार 370 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 9 लाख 31 हजार 813 तर ग्रामीण भागातील 12 लाख 51 हजार 557 नागरीकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज गुरूवारी 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Exit mobile version