Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यस्तरीय नारीदिप पुरस्काराने स्नेहल ठाकूर सन्मानित

जळगाव प्रतिनिधी । येथे शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या स्‍नेहल ठाकूर यांना खानदेश नारीशक्ती ग्रुप, खानदेश न्यूज नेटवर्क, खानदेश जनसेवा फाउंडेशन आणि इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव येथील विद्यमान आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते उपक्रमशील शिक्षिका म्हणून राज्यस्तरीय नारीदिप पुरस्कार नुकताच प्रदान करून सन्मान करण्यात आला.

स्नेहल ठाकूर या सध्या शिक्षण मंदिर संचलित अभिनव प्राथमिक विद्यालय सराव पाठशाळा जळगाव येथे कार्यरत असून अनेक शैक्षणिक व समाज प्रबोधन पर उपक्रम राबवून त्यांनी समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊनच त्यांना हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन, आमदार राजूमामा भोळे, चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण, धुळे येथील माजी महापौर जयश्रीताई अहिराव, ग. स. सोसायटी अध्यक्ष विलास नेरकर उपस्थित होते. स्नेहल ठाकूर यांनी हा फक्त पुरस्कार नसून समाजाप्रती एक नवा स्वप्न आणि ध्यास आहे असे म्हटलेले आहे. राज्यस्तरीय नारीदीप पुरस्कार सोहळा २०२१ हा एक स्त्रीत्वाचा उत्सव होता, असेही त्यांनी बोलताना सांगितले.

स्नेहल ठाकूर यांनी बोलतानाआसपासच्या परिसरातील लोकांच्या बोलण्यातली नकारात्मकता या सकारात्मक दृष्टीने घेऊन आपल्यात बदल केल्याचे आवर्जुन सांगितले. त्यांनी आपल्या या पुरस्काराचे श्रेय आपल्या परिवारासह विद्यार्थी व पालक वर्गाला दिले आहे.

Exit mobile version