प्रत्यक्ष सापांचं प्रात्यक्षिक दाखवत सर्पमित्रांनी दूर केली लोकांच्या मनातील भीती (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘नागपंचमी’च्‍या पार्श्वभूमीवर सर्पमित्रांनी जळगावातील गावांगावांमध्ये जात सापांबद्दल जनजागृती केली. ‘सापांबद्दल समज गैरसमज’ सांगत अंधश्रध्दा दूर करण्याचं व प्रत्यक्ष सापांचं प्रात्यक्षिक दाखवत लोकांच्या माणसातील भीती घालवण्याचं काम केलं.

पाचोरा तसेच जळगाव तालुक्यात विविध गावांमध्ये सर्पमित्रांनी जनजागृती केली. साप हा पर्यावरणाच्या जैविक साखळीतील महत्वाचा घटक समजला जातो. साप हा आपला मित्र आहे, शत्रू नव्हे; त्याला मारु नका तर जीवनदान द्या. असे आवाहन करत सर्पमित्रांनी जनजागृती केली.

जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमधील तरुण हे गेल्या १२ वर्षापासून सर्पमित्र म्हणून काम करताहेत. या काळात या सर्पमित्रांनी तब्बल २० ते २५ हजारांना सापांना जीवनदान दिलंय. ‘साप दूध पितो.’ यासह अनेक गैरसमज तसेच अंधश्रध्दा नागरिकांच्या मनात आहेत.

मंगळवार. दि. २ ऑगस्ट रोजी ‘नागपंचमी’ असल्याने भडगाव तालुक्यातील बाळद येथील सागर पाटील, भडगाव येथील सागर महाजन, पाचोरा येथील शैलेश पाटील, म्हसावद येथील दानिश पटेल व शिरसोली सर्पमित्र ऋषी बारी या सर्पमित्रांनी एकत्र येत गावा गावांमध्ये जनजागृती केलीय.

जळगाव जिल्ह्यात कोणते विषारी व बिनविषारी साप आढळतात, साप चावल्यावर काय प्राथमिक उपचार करावे, सापांबद्दल अंधश्रध्दा काय, याबाबत माहिती कार्यक्रमाव्दारे सर्पमित्रांनी दिली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.

व्हिडीओ लिंक : –

 

Protected Content