Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावलसह परिसरात अवैध गुटख्याचा धुमाकूळ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरासह तालुका आणि परिसरात प्रतिबंधीत असलेल्या अवैध गुटख्याची सर्रास विक्री होत असून यातून मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी आता करण्यात येत आहे.

यावल शहर आणि तालुक्यात सर्वत्र राज्य सरकारने प्रतिबंधीत केलेल्या व शेजारच्या ईतर राज्यातुन तस्करीतुन आयात करून विक्रीस येणार्‍या मौखिक आरोग्याच्या समस्या विविध गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण करणारा विमल गुटक्याची सर्रासपणे विक्री केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी पानटपर्‍यांपासुन ते किराणा दुकानांमधून लाखो रुपयांच्या पानमसाला पुडयांची विक्री करण्यात येत आहे. या नागरीकांच्या आरोग्यास निगडीत विषयाकडे संबधीतअन्न व औषद्य प्रशासन विभागाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अनेक पालक व सुज्ञ नागरीकांकडून करण्यात येत आहे. मात्र यावर कार्यवाहीसाठी टाळाटाळ करण्यात येत आहे.

यावल ,चोपडा आणी रावेर हे तिघ तालुके सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी लागुन असुन सिमा रेषेवर गुजरात आणी मध्यप्रदेश अशी दोन राज्य हे तालुक्यास लागून असल्याने या दोन्ही राज्यांमधून मोठया प्रमाणावर न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या विमल गुटका या पानमसालाची खाजगी वाहन व प्रसंगी एसटी व्दारे चोरट्या मार्गाने महाराष्ट्र वाहतुक होते.

यात यावल तालुक्यातील काही गुटका किंग यांच्याकडे मोठा माल येत असून नंतर तालुक्यात विविध ठिकाणी विक्रीसाठी या गुटक्याचे टप्प्या टप्याने वाटप करण्यात येत आहे. शेजारच्या परप्रांतातुन छुप्या मार्गाने आयात करून येणार्‍या या हानीकारक पानमसाला गुटक्याची मोठी उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, या बाबतची माहीती संबधीत अन्न व प्रशासन विभागाला नसावी का ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी लाखो रुपयांचा गुटका पकडला जात असुन मात्र यावल तालुक्यात प्रशासनाकडुन या विषयाकडे अर्थपुर्ण डोळेझाक करण्यात येत असल्याने कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version