Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Camp : डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात तिरळेपणा शिबिर; पुण्यातील तज्ञांद्वारे उपचाराची सुविधा

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लहान मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यंत डोळ्यातील तिरळेपणा असलेल्या रूग्णांची ही समस्या कायमची दूर होणार आहे. नेत्रविकारांशी संबंधित रूग्णांकरीता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.२४ ते ३० एप्रिल दरम्यान होणार्‍या शिबिरात पुण्यातील प्रख्यात नेत्ररोग तज्ञांसह दहा डॉक्टरांची टिम कार्यरत राहणार आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे जिल्ह्यासह खान्देश, विदर्भातील नेत्रविकार असलेल्या रूग्णांसाठी विशेष शिबीर घेण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये तिरळेपणा, मोतीबिंदू, पडद्यांचे विकार, रेटीना या सर्व विकारांची तपासणी आणि उपचार मोफत केले जाणार आहेत. शिबिरासह डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातही सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत रूग्णांची तपासणी व उपचार मोफत केले जाणार आहे. मोफत उपचारासाठी रूग्णांनी आधार कार्ड आणि रेशनिंग कार्ड आणणे आवश्यक आहे.

शिबिरात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्वीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील प्रख्यात तिरळेपणा आणि लहान मुलांच्या नेत्ररोग तज्ञ डॉ. प्रिती पाटील, रेटीना तज्ञ डॉ. अश्विनी पाटील, डॉ.नि.तु.पाटील, डॉ.निखील चौधरी, नेत्ररोग तज्ञ डॉ. दिशा गांधी, डॉ. मयुरी निलावाड, निवासी डॉ. कल्पना देशमुख, डॉ. आकाश मालवी, डॉ. अनुजा गाडगीळ, डॉ. शिफा, डॉ. आशुतोष अशी तज्ञांची टिम रूग्णांची तपासणी आणि उपचार करणार आहे. तरी ज्यांना डोळ्यातील तिरळेपणा किंवा डोळ्याशी संबंधित इतर विकार असतील त्यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

प्रथम येणार्‍या२० रुग्णांना प्राधान्य दिले जाणार असून नावनोंदणी व अधिक माहितीसाठी डॉ.कल्पना देशमुख यांच्याशी ९०७५१ ६५८८८, डॉ.अनुजा गाडगीळ यांच्याशी ९७०२१ ६४०६० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Exit mobile version