Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतजमिनीचा मोबदला मिळण्यासाठी “झोपा काढा” आंदोलन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गुळ माध्यम प्रकल्पाचा उजवा व डावा कालवासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा मोबदला तातडीने अदा करावी, या मागणीसाठी बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता शेतकरी संघटनेच्या वतीने  तापी महामंडळ कार्यालयात “झोपा काढा” आंदोलन करण्यात आले.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील तालुक्यातील गुळ मध्यम प्रकल्पाचा उजवा व डावा कालवा तयार करण्यासाठी शासनाकडून या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संबंधित केल्या होत्या. परंतु शासनाकडून शेत जमिनीचा मोबदला अद्यापपर्यंत मिळालेला नाही. गेल्या १६ वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी तापी महामंडळ कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. याबाबत निवेदन व विनंती आर्ज देखील केले. परंतू, शासनाकडून सार्फ दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने यापुर्वी निवेदन देवूनही २१ नोव्हेंबरपर्यंत शेतजमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने, अखेर बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता तापी महामंडळाच्या कार्यालयात प्रकल्पग्रस्त शेतकरी व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी झोपा काढा आंदोलन केले. जोपर्यंत आम्हाला जमिनीचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत तुमच्या कार्यालयातून जाणार नाही, असा पवित्र देखील आंदोलनकर्ते यांनी घेतला होता. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण गुर्जर, संदीप पाटील, विनोद धनगर, सचिन शिंपी यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version