Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काश्मीरमध्ये चकमक ; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

EAc5siSXoAElJy7

 

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यातील बोनाबाजार येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक उडाली होती. दरम्यान ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

आज पहाटे शापिया जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख अजून पटली नाही आहे.दक्षिण काश्मीरच्या शोपियातील बोना बाजारमध्ये 2 ते 3 दहशतवादी लपल्याची बातमी समोर आली होती. यानंतर जवानांनी संपूर्ण विभागाला घेरले आणि दहशतवाद्यांचा शोध सुरु केला. दहशतवादी एका घरात लपून बसले होते. त्यांनी जवानांना पाहिल्यानंतर त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनीही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात दोन्ही दहशतवादी ठार झाले.

Exit mobile version