Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोहराळा येथे ग्रामपंचायत व नबाब तडवी फाउंडेशनच्या वतीने महिलांना कौशल्य प्रशिक्षण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील मोहराळे ग्रामपंचायत व नबाब उघडू तडवी या आदीवासी समाजसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत अतिदुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या आदीवासी महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले.

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोहराळा ग्रामपंचायतच्या सभागृहात मोहराळा हरिपुरा ग्रुप ग्रामपंचायत व नबाब उघडू तडवी गुरूजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या अतिदुर्गम क्षेत्रातील आदीवासी महीला व बेरोजगार तरूणींना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत शिलाई मशीन प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहराळा ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच सौ नंदा गोपाळ महाजन या होत्या तर प्रमुख पाहूणे म्हणुन उपसरपंच रूबीना जावेद तडवी, नबाब उघडू तडवी गुरूजी फाउंडेशन चुंचाळे या संस्थेचे अध्यक्ष मुबारक तडवी, संस्था उपाध्यक्ष शरीफ तडवी, कौशल्य विकास कार्यकर्माचे व्यवस्थापक युवराज वानखेडे यांच्या सह ग्रामसेवक राजेश महाजन, ग्रामपंचायत सदस्य राजु भुरा तडवी, जहाँगीर रौदल तडवी, भरत सदाशिव महाजन, अकील हसन तडवी, हपशान सुलेमान तडवी, मुमताज जहाँगीर तडवी, यशवंत विलास महाजन, प्रमोद दगडू महाजन, अनिल केशव अडकमोल, रूखसाना शरीफ तडवी, रेहाना बबलु तडवी यांच्यासह आदी आदिवासी चळवळीतील समाजसेवक व ग्रामस्थ मोठया संख्येत कार्यक्रमास उपस्थित होते.  या शिलाई मशीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच नंदा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले , यावेळी आदीवासी समाजातील ६६ महीला व बेरोजगार तरूणींना प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्यात आले .

Exit mobile version