Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहुर येथे पेट्रोल पंपाच्या मँनेजरला पिस्तुल दाखवून सहा लाखांची लूट


पहूर ता.जामनेर (रवींद्र लाठे)  पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण गावात दुकाने व बाजारपेठ बंद ठेवण्यात आले होते. या गोष्टीचा फायदा घेत पिस्तुल दाखवून बँकेत भरणा करण्यासाठी जात असलेल्या पेट्रोल पंपाच्या मँनेजरकडून साडेसहा लाखांची रोकड लुटल्याची घटना आज दुपारी घडली. विशेष म्हणजे लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.

या संदर्भात अधिक असे की, पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण गावात दुकाने व बाजारपेठ बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे गावात बऱ्यापैकी शुकशुकाट होता. येथील अजिंठा टेंडर्स पेट्रोल पंप मॅनेजर संजय पारखे व  सोबत असलेला  कर्मचारी समाधान कुंभार हे नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावरील शनिवार व रविवार या दोन दिवसाचा भरणा सहा लाख तीस हजार रुपये घेऊन पहूर येथील युनिनय बँकेमध्ये आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बँकेत जामनेर रोडवरील युनियन बँके जवळ आपली मोटरसायकल उभी करत असताना त्यांना समोरून येणाऱ्या पल्सर मोटरसायकल धडक दिली. त्यानंतर पल्सरवरील तीन जणांनी अंगा स्प्रे मारून तसेच बंदुकीचा धाक दाखवून हातातील सहा लाख तीस हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग हुसकावून घेतली. त्याठिकाणी  बँकेचे शेजारी असलेले दुकानदार शितल जैन  यांनी हातात दगड घेऊन  प्रतिकार केला. तसेच आजूबाजूला असलेले  वीस ते पंचवीस लोकांनी देखील धाव घेतली असता दरोडेखोरांनी त्यांच्याकडील बंदुकीचा दाखवून जामनेरच्या दिशेने भरधाव वेगाने पळ काढला. दरम्यान, तिघे चोरटे जामनेरकडे पळाल्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी नाकाबंदी केली असून तपास चक्र फिरवायला सुरुवात केली आहे. गावातील तसेच बँकेतील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलीस गोळा करीत आहेत.

Exit mobile version