Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ट्रॅक्टर व कारचा भीषण अपघात : जिल्ह्यातील सहा जणांचा मृत्यू !

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ट्रॅक्टरसह ट्रॉली उलटून कारवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मयत आणि जखमी हे पारोळा, जामनेर आणि भडगाव तालुक्यातील रहिवासी असून यातील नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

या संदर्भातील वृत्त असे की, रस्त्याच्या कामासाठी मजुरांना घेऊन चाललेल्या ट्रॅक्टरचा काल सायंकाळी भीषण अपघात झाला. वणी-कळवण रस्त्यावर मुळाणे घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह कारवर उलटून हा अपघात झाला. सहा मजूर ठार झाले. तर १५ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे येथील पवार कुटुंबातील तीन सदस्य ठार झाले असून पाच जखमी झाले आहेत. हे कुटुंब मजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवत असे. रस्ते कामासाठी बाहेर जाणार्‍या या कुटुंबावर काळाचा क्रूर आघात झाला आहे. यात सरला आणि वैशाली बापू पवार या चार वर्षांच्या जुळ्या मृत्यूमुखी पडल्या. तर पोपट गिरीधर पवार (वय ४०) यांचा देखील मृत्यू झाला. तर पारोळा तालुक्यातीलच अंजनेरा येथील मोरे कुटुंबावरही यात वज्राघात झाला. यामध्ये रामदास बळीराम मोरे ( वय ४८); आशाबाई रामदास मोरे ( वय ४०) आणि बेबाबाई रमेश गायकवाड ( वय ४० ) या तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

या अपघातात ट्रॉलील बसलेले मजुर जखमी झाले. यामध्ये बापू पवार (वय ४५, रा. उंदीरखेडा, ता. पारोळा,); सुवर्णा पोपट पवार (वय १३, रा. उंदीरखेडा), विशाल पोपट पवार (वय ११, रा. उंदीरखेडा), आकाश पोपट पवार (वय १५, रा. उंदीरखेडा), सागर रमेश गायकवाड (वय २३, रा.अंजनेरा), सुरेखा अशोक शिंदे (वय २२, रा.हिंगोणा), संगीता पोपट पवार (वय ४५, रा. उंदीरखेडा), लक्ष्मण अशोक शिंदे (वय २१, रा. हिंगोणा), तनू दीपक गायकवाड (वय ३, रा.कुसुंबा), दीपक बाबूलाल गायकवाड (वय ३०, रा. कुसुंबा) , अनुष्का दीपक गायकवाड (वय १, रा. कुसुंबा), मनीषा दीपक गायकवाड (वय २४, रा. कुसुंबा), गणेश बापू पवार (वय ७, रा.उंदीरखेडा), प्रिया संजय म्हस्के (वय ३, रा.जामनेर), अजय नवल बोरसे (वय २, रा. मिराड), यांचा समावेश आहे.

Exit mobile version