Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ज्ञानदादाकडून बहिण मुक्ताई साडीचोळी भेट (व्हिडीओ)

मुक्ताईनगर प्रतिनिधी । पंढरपूरात सालाबादप्रमाणे आषाढी ‌वारीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या कडून भगीनी आदिशक्ती मुक्ताबाईस साडीचोळी भेट देण्याचा ऐतिहासिक भावनिक सोहळा शुक्रवारी मुक्ताबाई मठात पार पडला. त्यावेळी भावीक भावविभोर झाले होते.

शेकडो वर्षांची परंपरा जपत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमीटी आळंदी तर्फे विश्वस्त योगेश देसाई यांनी मुक्ताबाई पादूकांना मंत्रोच्चारात पंचामृत अभिषेक पुजा करून साडीचोळी अर्पण व आरती केली पौराहित्य निखील प्रसादे यांनी केले.आळंदी संस्थानचे व्यवस्थापक  रविराज बींडे श्री संत मुक्ताबाई संस्थान  कोथळी- मुक्ताईनगर अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील, विश्वस्त शंकरराव पाटील , निळकंठराव पाटील, पंजाबरावदादा पाटील, पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे, उध्दव जुनारे महाराज, नरेंद्र नारखेडे, सम्राट पाटील, नायब तहसिलदार प्रदिप झांबरे,रतिराम ‌शास्त्री , संदीप महाराज मोतेकर,बबलू पाटील कासारखेड,अजाबराव पाटील, ज्ञानेश्वर हरणे , शशी पाटील व भाविक उपस्थित होते.  भाऊ बहिण भेटीचा सोहळा अनुभवतांना भाविक  भक्त भावनिक झाले होते. आज सकाळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर व दुपारी सद्गुरू सखाराम महाराज ईलोरा दिडीं परंपरेचे गादीपती व वंशज विश्वंभर महाराज तिजारे यांचे कीर्तन झाले. परतीचे प्रवासात शिवशाही बस सजवण्याची सेवा नरेंद्र नारखेडे फैजपूर व भागवत पाटील कासारखेडा यांनी दिली.

गोपाळपूर काला व पांडुरंगाचे दर्शन करून उद्या माघारी परतणार

श्री संत मुक्ताबाई पालखी पादूका सोहळा उद्या शनिवारी सकाळी 6 वा.गोपाळपूर येथे गोपाळकाला निमित्त ह.भ.प.रविंद्र महाराज हरणे यांचे काल्याचे कीर्तन होईल.  तसेच भगवान श्रीविठ्ठल दर्शन व निरोप घेवून दुपारी माघारी मुक्ताईनगर परतणार आहेत. रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पालखी सोहळा नविन मंदीरात मुक्ताईनगर येथे पोहचेल.

 

 

Exit mobile version