Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिंधुताईं सपकाळ सैनिकांच्या देश सेवेबरोबरच समाज कार्याने भारावल्या

WhatsApp Image 2019 05 12 at 8.33.33 PM

चाळीसगाव (प्रतिनिधी) जे सैनिक ड्युटीवर असताना देशाची सेवा करतात ,आणि घरी सुट्टीवर आल्यावर समाजिक देणे लागतो या उदांत्त हेतूने परिसरात समाजसेवा करतात, त्यांच्या या उपक्रमाला पाहून आज मीच भारावून गेले आहेअसे उद्गगार सिंधुताई सकपाळ यांनी काढले. त्या खानदेश रक्षक ग्रुप यांच्या सौजन्याने भडगाव तालुक्यातील बांबरुड ( प्र.बहाळ ) या गावी सरस्वती सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

 

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोर पाटील,पाचोऱ्याचे युवा नेते अमोल शिंदे, बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील,  जळगाव महानगरपालिकेच्या नगरसेविका उज्वला बेंडाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. करता सिंग परदेशी, बांबरुड चे सरपंच बाप्पू परदेशी, चाळीसगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, भडगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक परदेशी ,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिंधुताई पुढे म्हणाल्या की , योगायोगाने आज जागतिक मातृत्व दिन असून येथे जमलेल्या सैनिकांच्या माता, व ज्या सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात अशा सैनिकांच्या पत्नींना मी आशीर्वाद व शुभेच्छा देते. कारण मातेचा आशीर्वाद व पत्नीची खंबीर साथ, यामुळेच सैनिकाला सीमेवर लढताना बळ मिळते. त्याचबरोबर स्वतःच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी महिलांनी सिंधुताईंचे औक्षण केले. यावेळी डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित, अनाथांची आई , या पुस्तकाच्या ५० प्रतींचा संच ताईंच्या हस्ते,येथील सरस्वती वाचनालयास भेट म्हणून देण्यात आल्या. यशस्वीतेसाठी खानदेश रक्षक ग्रुपचे संस्थापक सचिन पाटील, उप संस्थापक समाधान पाटील, सेक्रेटरी राहुल रावते ,प्रवीण महाजन, मनोहर महाले, प्रवीण राजपूत ,सुवर्ण सिंग राजपूत ,विनोद परदेशी, सुनील राजपूत, किशोर महाले ,बाबासाहेब वाल्मीक गरुड ,किशोर पाटील ,सोनू महाजन यांच्यासह अनेक फौजी बांधवांनी परिश्रम घेतले. आभार बांबरुड येथील सैनिक सुवर्ण सिंग सिंग राजपूत यांनी मानले.

Exit mobile version