Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिंधूताई सपकाळ यांचे निधन : अनाथांची माता काळाच्या पडद्याआड

पुणे प्रतिनिधी | अनाथांची माता म्हणून ख्यात असणार्‍या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे आज उपचार सुरू असतांना निधन झाले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचे आज निधन झाले. ७३ वर्षांच्या होत्या, रात्री ८ वाजून १० मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सिंधूताई सपकाळ यांनी आजवर हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर २०२१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक संवेदना व्यक्त करण्यात येत आहे.

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी समाजातील निराधार बालकांचे संगोपन करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पीत केले आहे. आजपर्यंत सुमारे १००० मुले सज्ञान होऊन बाहेर पडले आहे. पुण्याजवळील मांजरी बुद्रुक शिवारात माईंचे मनशांती छात्रालय असून येथे ५० मुले आश्रयास आहे. सासवड येथील केंद्रात ७५ मुली व शिरुर येथील केंद्रात ५० मुले, चिखलदार येथे ७५ मुली, वर्धा येथे २५० भाकड गायी आहे.

Exit mobile version