Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईडीची चौकशी झाल्यापासून राज ठाकरे कमी बोलताय : अजित पवार

3ajirp

 

बारामती (वृत्तसंस्था) सरकारने कितीही चौकश्या लावल्या तरीही माझा आवाज बंद होणार नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटले होते. मात्र आता चौकशीनंतर राज ठाकरे यांचे बोलायचे कमी झाले आहेत, असे म्हणून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार खळबळ उडवून दिली आहे.

 

‘सत्ताधारी पक्ष पैशांची आणि विविध चौकश्यांची भीती दाखवत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी चौकशी झाल्यापासून तेही बोलायचे कमी झाले आहेत, असे अजित पवार यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. तर कोहिनूर मिलप्रकरणी राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी ईडीकडून चौकशी करण्यात आली. सरकारविरोधात भूमिका घेतल्यानेच राज ठाकरेंमागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. पण सरकारने कितीही चौकश्या लावल्या तरीही माझा आवाज बंद होणार नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. मात्र आता अजित पवार यांनी राज ठाकरे चौकशीनंतर बोलायचे कमी झाले आहेत, असे म्हटले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यावर काय उत्तर देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत काँग्रेस सोडणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांनी फटकारलं आहे. ‘तीन पिढ्या सरकारमध्ये असताना आणि मंत्रिपद देऊनही काही लोक पक्ष सोडून जात आहेत,’ असं म्हणत अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ‘अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो. मग कितीही किंमत मोजावी लागली तरी तो पाळतो. हर्षवर्धन पाटील खोटे आरोप करत आहेत. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असा शब्द दिला होता,’ असा खुलासा अजित पवार यांनी दिला आहे. आम्ही हर्षवर्धन पाटील यांना 50 ते 55 फोन केले पण ते भेटले नाहीत. सांगायला काही नाही म्हणून ते आता राष्ट्रवादीवर आरोप करत आहेत, असा पलटवार अजित पवार यांनी केला आहे.

Exit mobile version