Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महर्षी व्यास मंदिरात साधेपणाने गुरुपौर्णिमा साजरी

यावल प्रतिनिधी । संपुर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शहरातील महर्षी व्यास मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात आला. 

या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी पार पाडण्यात आला. भाविकांना दर्शनासाठी मंदिरात कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर प्रवेश देण्यात आले नसले तरी शहरातील एकता दुर्गोत्सव मंडळातर्फे संपूर्ण कार्यक्रमाचे व श्रीमहर्षी व्यासांचे दर्शनाचे प्रक्षेपण ऑनलाईन दाखविण्यात आला. गुरुपौर्णिमा निमित्त येथे महर्षी व्यास मंदिरामध्ये सकाळी आठ ते दहा या वेळेत काही मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत श्रीमहर्षी व्यासांची महापूजा करण्यात आली. 

या पूजेमध्ये प्रियंका व निशिकांत देशमुख, सुरेखा व नामदेव बारी, उर्मिला व संतोष पाटील ( धानोरा ता. चोपडा) आशा व ठाणसिंग पाटील, व जयश्री व सागरदास  बैरागी या पाच जोडप्यांच्या हस्ते महर्षी व्यास मुनींच्या मूर्तीस महाअभिषेक होऊन महापूजा झाली. यात धार्मिक विधीसाठी अतुल बावीसे, महेश बयाणी, सारंग बावीसे, निखिल वैद्द, हेमंत मुळे, सागर जोशी, प्रथमेश बयाणी, भानुदास बैरागी, रघुनाथ बावीसे, प्रथमेश बैरागी , वनराज बैरागी यांनी पौराहित्य केले. प्रसंगी यावल येथील दुध व्यवसायीक व सामाजीक कार्यकर्त सचिन मिस्त्री यांनी दर्शनासाठी आलेल्या मोजक्या भाविकांना मोफत दुध वितरीत केले. यावेळी महर्षी व्यास व श्रीराम मंदिर समितीचे विश्वस्त प्रमोद गडे, अशोक महाजन, शशिकांत देशमुख, सुनिल भोईटे, राजेंद्र निकुंभ, पुरुषोत्तम करांडे, एस.के. बाऊस्कर सर, रामदास करांडे आदींनी सहकार्य केले.

येथे शहरात संत जनार्दन स्वामी आश्रम, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर स्मृति मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, स्वामीनारायण मंदिर सह विविध गुरू मंदिरात आज सकाळी गुरुपौर्णिमेनिमित्त विधिवत महापूजा, महाअभिषेक होऊन गुरूपौर्णिमा उत्सव साधेपणाने साजरा झाला. यावेळी मंदीर विश्वस्तांच्या वतीने कोविड१९च्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले .

 

Exit mobile version