Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेस नेते सिध्दू मूसेवाला हत्येच्या निषेधार्थ मूक आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंजाबमधील काँग्रेस नेते सिध्दू मूसेवाला यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ शाहू नगरातील जिल्हा काँग्रेस भवनात जिल्हा युवक काँग्रेसतर्फे मुक आंदोलन करण्यात आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी, पंजाब राज्यातील सुप्रसिध्द गायक आणि काँग्रेसचे युवक नेते सिध्द मुसेवाला यांची रविवारी २९ मे रोजी अज्ञातांकडून गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना पंजाब राज्यातील मानसा येथे घडली आहे. पंजाब सरकारने राजकारणी, धार्मिक नेते, माजी राज्यसभा सदस्य, माजी आमदार, माजी सभापती, निवृत्त पोलीस कर्मचारी आणि इतरांसह ४२४ लोकांना दिलेली सुरक्षा काढून घेतली आहे.  पंजाब सरकारने ४२४ व्हीआयपींची सुरक्षा काढून होती. या निर्णयाला एक दिवस उलटला आहे. तोच पंजाबमधील गायक, काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, याला सर्वस्वी आपचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आप पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. याच्या निषेधार्थ शाहू नगरातील जिल्हा काँग्रेस भवनात जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने प्रतिमा पूजन करून मूक आंदोलन करण्यात आले.

 

याप्रसंगी युवक काँग्रेसच जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, राहुल माणिक, माजी प्रदेश महासचिव बाबा देशमुख, शहर महानगर जिल्हाध्यक्ष मुजीब पटेल, शहर महानगर उपाध्यक्ष शोएब पटेल, जळगाव शहर उपाध्यक्ष पराग घोरपडे,  फैज़ान शाह, मकसूद पटेल, शकील शेख, मुरली सपकाळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version