Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे दिसून आले आहे.

देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २२,२७० नवे रुग्ण आढळून आले. तर ३२५ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ६०,२९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ४ कोटी २० लाख ३७ हजार ५३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोनामुक्ती दर ९८.१२ टक्के इतका आहे. सध्या देशात २ लाख ५३ हजार ७३९ क्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १.८ टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत देशातील ५ लाख ११ हजार २३० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे १७५ कोटी डोस देण्यात आले आहेत.

याआधी  गुरूवारी दिवसभरात २५ हजार ९२० कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ४९२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. दिवसभरात ६६ हजार २५४ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती.   दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातील कोरोना मृतांचा आकडा १५ हजारांवर गेला आहे. जानेवारी महिन्यात कोरोनाने १४,७५२ जणांचा बळी घेतला होता. पण फेब्रुवारी महिन्यात जानेवारीच्या तुलनेत अधिक मृत्यू झाले आहेत. जुलै नंतर सात महिन्यातील हा उच्चांकी आकडा आहे.

Exit mobile version