Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथे स्वाक्षरी मोहीम

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या शेतकरी विधेयकाला विरोध करण्यासाठी आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते आज शहरातील सुभाष चौक येथे शेतकरी वर्गाची स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली.

केंद्राने शेतकऱ्यांच्या विरोधात कृषी विधकयक बिल पास करून शेतकऱ्यांची दिशाभुल केली असल्याचे आ शिरीष चौधरी यांनी सांगितले. 

याप्रसंगी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे,रावेर तालुका काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी कृ.उ.बा सभापती केतन किरंगे, प.स.सदस्य शेखर पाटील, काँग्रेस गटनेता कलीम खान मन्यार, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, शिवसेनेचे प्रभाकर चौधरी,बबन तायडे,रामराव मोरे,काँग्रेस शहराध्यक्ष रियाज मेंबर,मोहसीन खान, मुकेश हंसकर तसेच शेतकरी मधुकर चौधरी, लिलाधार वसंत चौधरी, अशोक बोरोले, मयूर बोरोले, किरण बोरोले, अनिल भोळे यांच्या सह शेतकरी बांधव उपस्थित होते

 

Exit mobile version