Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खड्डयात बुडून बहिण-भावाचा मृत्यू

चोपडा प्रतिनिधी । शहरातील गोरगावले रोडाचे काम सुरू असून यासाठी केलेल्या खड्डयांमधील पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडली. या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की,  गोरगावले रोडालगत ८ ते १० खड्डे जीसीबीने करून ठेवले आहेत आणि तेही १० ते १२ फूट खोल असलेल्या खड्ड्यात कॉलनीचे पाणी साचत असते. मागील काही दिवसांपासून गोरगावले रोडाचे काम बंद आहे तरी संबंधित ठेकेदाराने खड्ड्यात माती टाकून बुजले नाहीत. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून कॉलनीचे रहिवासीनी सांगितले की, खड्डे बुजवून दया. परंतु याकडे संबंधित लोकांनी दुर्लक्ष केले. आज या खड्डयांनीच दोन चिमुकल्याचा जिव घेतला.

गंगाई नगर लगत असलेल्या दोन खड्डे आहेत. त्यातील शहरांकडील भागातील खड्ड्यात लोकेश रविंद्र पावरा (बारेला), वय ९ वर्ष , रोशनी रविंद्र पावरा वय – ६ वर्ष,ह्या दोघ मुलांचे आई वडील कामावर गेले असता दोघ मुले खेळत असताना अचानक त्या खड्ड्यात पडून साचलेल्या घाण पाणी नाकात तोंडात जाऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना जवळपास ४ ते ४;३० च्या दरम्यान असावी असे रविंद्र बापू पावरा( बारेला ), यानें बोलतांना सांगितले.

जवळपास ५ वाजेला मुलांची आई ललिता रविंद्र बारेला ही कामावरून घरी आली असता मुलांचा शोध घेतला असता तर मुलगी रोशनी ही पाण्यातुन वर आलेली होती. त्यामुळे दोघ मुले याचं खड्ड्यात असावे म्हणून तिने जोरात आक्रोश करत हंबरडा फोडला. आणि रविंद्रला  बोलवायला पाठविले तेव्हा त्यानेही पाहताच हंबरडा फोडला आणि आक्रोश करत होते.

ठेकेदार मिलिंद अग्रवाल (भुसावळ) हे आहेत असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनिअर प्रमोद सुशिर यांनी सांगितले दोघ मुलांना उपजिल्हा रुग्णालयात आणले असता येथील डॉ हर्षाली गांगुर्डे यांनी दोघ मुलांना मृत घोषित केले.

याबाबत जमलेले सर्व आदिवासी बांधव व मुलांचा मामा प्रकाश रमेश बारेला यानें बोलताना सांगितले की, ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली. यावेळी नगरसेवक किशोर चौधरी ,गजेंद्र जैस्वाल ,  रविंद्र बारेला ज्यांच्या कडे काम करतो ते योगेश मराठे यांच्या कॉलनी परिसरातील नागरिक उपस्थित होते याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मुलांची प्रेत ताब्यात घेणार नाही असे सर्व आदिवासी बांधवांनी सांगितले आहे. त्यामुळेच पोस्टमोर्टम सुद्धा करू दिले नाही असे समजते आदिवासी बांधवांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

Exit mobile version