Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिला बचत गटांना श्रीराम पाटील यांनी दिले यशस्वीतेचे धडे !

shriram patil raver programme

रावेर प्रतिनिधी । येथील ख्यातप्राप्त उद्योजक श्रीराम पाटील यांनी महिला बचत गटाच्या सदस्यांना ‘हिकरणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ या कार्यक्रमात यशस्वीतेचे धडे दिले.

रावेर पंचायत समिती येथे शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उदद्योजकता विभागाकडून आयोजित हिरकणी नवउदद्योजक महाराष्ट्राची या मार्गदर्शन मेळाव्यात श्रीराम उद्योग समूहाचे प्रमुख श्रीराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, व्यवसाय लहान असो वा मोठा तो करत असतांना ग्राहकांचा विश्‍वास, आणि व्यावहारिक काटकसर ही त्रिसूत्री आपण अंगिकारल्यास आपल्याला यश नक्कीच मिळते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी सोनिया नाकाडे या होत्या. प्रमुख उपस्थितांमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ चे उल्हास पाटील, रावेर नपाच्या समुदाय संघटिका सौ रेखा नाईक तालुका व्यवस्थापक महेंद्र वाघ यांचा समावेश होता. प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक अंकुश जोशी यांनी हिरकणी नव उडद्योजक या विषयावर सांगून सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला तालुक्यातील महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version